Posts

Showing posts from October, 2021

मन सुद्ध तुझं भाग ३

Image
  मन सुद्ध तुझं -  भाग ३  (मागील रविवारचा भाग) केमिकल लोच्या  प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट कोंडलेल्या गॅसचा स्फोट झाला तर अख्खी इमारत पाडण्याची शक्ती त्यामध्ये असते. मात्र बुद्धीचा वापर केला तर महिनाभर स्वयंपाकासाठी त्याच गॅसचा वापर करता येतो.  वयात येणार्‍या मुलांचे मनही असे अत्यंत ज्वलनशील सिलिंडर असते.  अशाच एका नववीतल्या मुलीची गोष्ट 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या तिसर्‍या भागात येते. परी नावाची ही मुलगी स्मार्ट असते, पण अक्कल नावाची गोष्ट अजून आलेली नसते. ती अचानक खड्ड्यात पडावी तशी प्रेमात पडते. तिचे आईवडील नेहमीप्रमाणे आकांडतांडव करून बघतात. त्यावर ती आत्महत्येची धमकी देते. आणि मग हे प्रकरण मनाच्या डाॅक्टरकडे येते.  डाॅक्टर त्यांच्या टेबलवर ठेवलेले मेंदूचे माॅडेल परीला दाखवतात आणि तिला सांगतात की, सध्या तिला जे प्रेम वगैरे वाटते आहे ती मेंदूच्या मधल्या भागातून रक्तात मिसळणारी रसायने आहेत. त्यावर बुद्धीचा ताबा ठेवणारा भाग अजून वाढतो आहे. माणूस आणि प्राण्यांमध्येही हा मधला भाग सारखेच काम करतो. त्यामुळे वयाच्या १८व्या वर्षांपर्यंत आपल्याला गाडी चाल...

सुद्ध मनाची मालिका

Image
 'सुद्ध' मनाची मालिका आज माणसाचे मन आधीच विक्षिप्त झालेले आहे. त्याला आणखी बावचळून टाकण्याचे काम टीव्ही आणि ओटीटीवरील बर्‍याच मालिका इमानदारीने करतात.  परंतु दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी जेव्हा एखादी टीव्ही मालिका घेऊन येतात तेव्हा तिला निश्चित दिशा आणि उद्देश असतो.  सध्या 'एबीपी माझा' या बातम्यांच्या वाहिनीवर त्यांची मालिका सुरू आहे. नांदेड येथील मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. नंदू मुलमुले यांच्या अनुभवांवर आधारित 'मन सुद्ध तुझं' ही मालिका दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता दाखवली जाते.  मन म्हणजे काय? हा प्रश्न सतत माणसाला छळतो. त्यावर फ्राइड, पावलाव आणि इतर असंख्य शास्त्रज्ञांनी अचाट प्रयोग करून मनाचे वागणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तरी हे विचित्र 'मन' पूर्णपणे हाती लागलेले नाही.  मन जरी उभ्या पिकातलं ढोर आणि जहरी आहे तरी त्यावर बर्‍यापैकी उपचार आज करता येतात.  अंधारात कीड लागलेली वस्तू उघड्यावर, लख्ख उन्हात आणून ठेवली की त्यातली कीड मरून जाते. तेच काम ही मालिका सध्या करत आहे. मनावर प्रखर जाणीवेचा उजेड टाकला की त्याच्या गाठी स्पष्टपणे दिसू लागतात. त्या गाठी उकल...