मन सुद्ध तुझं भाग ३
मन सुद्ध तुझं - भाग ३ (मागील रविवारचा भाग) केमिकल लोच्या प्रेमात पडलेल्या मुलीची गोष्ट कोंडलेल्या गॅसचा स्फोट झाला तर अख्खी इमारत पाडण्याची शक्ती त्यामध्ये असते. मात्र बुद्धीचा वापर केला तर महिनाभर स्वयंपाकासाठी त्याच गॅसचा वापर करता येतो. वयात येणार्या मुलांचे मनही असे अत्यंत ज्वलनशील सिलिंडर असते. अशाच एका नववीतल्या मुलीची गोष्ट 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या तिसर्या भागात येते. परी नावाची ही मुलगी स्मार्ट असते, पण अक्कल नावाची गोष्ट अजून आलेली नसते. ती अचानक खड्ड्यात पडावी तशी प्रेमात पडते. तिचे आईवडील नेहमीप्रमाणे आकांडतांडव करून बघतात. त्यावर ती आत्महत्येची धमकी देते. आणि मग हे प्रकरण मनाच्या डाॅक्टरकडे येते. डाॅक्टर त्यांच्या टेबलवर ठेवलेले मेंदूचे माॅडेल परीला दाखवतात आणि तिला सांगतात की, सध्या तिला जे प्रेम वगैरे वाटते आहे ती मेंदूच्या मधल्या भागातून रक्तात मिसळणारी रसायने आहेत. त्यावर बुद्धीचा ताबा ठेवणारा भाग अजून वाढतो आहे. माणूस आणि प्राण्यांमध्येही हा मधला भाग सारखेच काम करतो. त्यामुळे वयाच्या १८व्या वर्षांपर्यंत आपल्याला गाडी चाल...